ताज़ा खबरे
Home / Uncategorized / गुजरात किनाऱ्यावर ३५०० कोटींचे हेरॉइन जप्त

गुजरात किनाऱ्यावर ३५०० कोटींचे हेरॉइन जप्त

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजातून मोठ्या प्रमाणात हेरॉइन पकडले आहे. जप्त करण्यात आलेले हे हेरॉइन १५०० किलो इतके प्रचंड आहे. या एकूण हेरॉइनची किंमत ३५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने आज दुपारी १२ वाजता ‘समुद्र पावक’ नावाच्या जहाजाला अडवले. आयसीजी, आयबी, पोलिस, कस्टम, नौदल आणि इतर सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेरॉइन जप्ती केल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने पोरबंदरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपची तातडीने बैठकही बोलावली होती अशी माहिती ग्रुपच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *