ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / GSTमुळं अर्थव्यवस्थेचा कायापालट!: मोदी

GSTमुळं अर्थव्यवस्थेचा कायापालट!: मोदी

नवी दिल्ली: ‘वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू होऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. मात्र, आतापासूनच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ग्राहक, व्यापारी आणि सरकारमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे,’ असं सांगतानाच, ‘जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आहे,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.
रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. अर्थव्यवस्थेतील क्रांतिकारी सुधारणा म्हणून ओळखला गेलेला जीएसटी कायदा लागू होऊन ३१ जुलै रोजी एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी यांनी जीएसटी कायद्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. जीएसटीमुळे गरीबांवर कुठलाही भार पडणार नाही, याकडं प्रत्येक राज्य सरकारनं प्राधान्यानं लक्ष दिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकार समन्वयानं काम करत आहेत. जीएसटी हे संघराज्यातील सहकार्याचं एक अनोखं उदाहरण म्हणून पुढं आलं आहे. इतक्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे यश आहे. येत्या काळात जगातील अर्थतज्ज्ञांसाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल,’ असं मोदी म्हणाले. याशिवाय, गेल्या महिनाभरातील अनेक क्षेत्रांतील घडामोडींवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून होणारं भाषण छोटं असेल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *