ताज़ा खबरे

नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या पत्नी एडविना माउंटबॅटन या दोघांमध्ये प्रेमसंबंधांबाबत अनेक दावे, प्रतिदावे केले जातात. अशात आता खुद्द एडविना यांची मुलगी पामेला यांनी मोकळेपणाने या विषयावर भाष्य केले आहे. ‘माझी आई आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात प्रेम संबंध असले, तरी त्यांचे शारीरिक संबंध कधीही नव्हते. याचे कारण म्हणजे ते दोघे कधीही एकांतात भेटलेले नाहीत. ते दोघेही एकमेकांचा खूपच आदर करत असत’, अशा शब्दात पामेला यांनी नेहरू-एडविनासंबंधित चर्चेवर आपले मत मांडले आहे.
जेव्हा माउंटबॅटन यांची भारताचे अंतिम व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी पामेला यांचे वय १७ वर्षे इतके होते. आपली आई एडविना आणि पंडित नेहरू या दोघांमध्ये जवळचे संबंध प्रस्थापित झाल्याचे पामेला यांनी पाहिले आहे. ‘माझ्या आईला आत्मिक समानता, बुद्धिमत्ता खूपच आवडत असे. हे सगळे गुण तिला पंडित नेहरू यांच्यामध्ये आढळून आले’, असेही पामेला यांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या संबंधांबाबत पामेला यांना आणखी जाणून घेण्याची इच्छा होती. परंतु, पंडित नेहरू आपल्या आईवर कशा प्रकारे प्रेम करत होते, तसेच ते कशा प्रकारे तिचा आदर राखत होते हे आपण आपल्या आईला पंडित नेहरू यांनी लिहिलेल्या पत्रांवरून जाणवले असे पामेला यांनी म्हटले आहे.
आपली आई एडविना आणि पंडित नेहरू यांच्यात शारीरिक संबंध होते का, याबाबत पामेला यांना जाणून घेण्याची उत्सुकता होती असे पामेला यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. परंतु, पामेला यांनी जेव्हा आपल्या आईने पंडित नेहरू यांना लिहिलेले पत्र वाचले तेव्हा त्या दोघांमध्ये असे संबंध नसल्याची खात्री त्यांना पटली असे आपल्या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *