ताज़ा खबरे
Home / pimpri / महिला दिवस पर आरोग्य शिबिर और विभिन्न खेलों का कार्यक्रम संपन्न

महिला दिवस पर आरोग्य शिबिर और विभिन्न खेलों का कार्यक्रम संपन्न

पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील संदीप वाघेरे युवा मंच व स्मॉल इक्विटास फायनान्स बँक लि.यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सदर कार्यक्रमात प्रभागातील अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.  यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, स्मॉल इक्विटास फायनान्स बँक ली चे श्री. संग्राम पाटील, सौ. माधुरी मुसळे,पोलिस मित्र संघटनेच्या अध्यक्षा अनिता भिसे, समाज प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे इत्यादी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे नियोजन सौ. रंजना जाधव, आरती निगडे, गणेश मंजाळ, मयुर कचरे यांनी केले. पोलिस मित्र संघटनेच्या अध्यक्षा अनिता भिसे, समाज प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे यांचा तसेच उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.  सौ. शारदाताई मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांना जाणवलेला स्त्रीत्वाचा अर्थ, स्त्री म्हणून त्यांनी अनुभवलेला जगण्याचा अर्थ आणि सर्वच क्षेत्रातल्या आजच्या स्त्रियांच्या भरारीविषयी महिलांना सांगत आपल्या समोरील अनेक अडचणीना हसत सामोरे जाऊन आपले ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *