ताज़ा खबरे
Home / खेल / दर्जेदार खेळ करत राहिल्यास यश हमखास मिळते – शैलजा मोरे

दर्जेदार खेळ करत राहिल्यास यश हमखास मिळते – शैलजा मोरे

पिंपरी। खेळाडूंनी सतत दर्जेदार खेळ करत राहिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन उपमहापौर शैलजा मोरे यांनी केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड शहर रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी महापौर कविचंद भाट महापौर चषक राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रबोधनकार ठाकरे मैदानावरील स्केटिंग रिंग, यमुनानगर निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमासस माजी महापौर कविचंद भाट, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य उत्तम केंदळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, मनपा अपंग कल्याण समिती सदस्य विश्वनाथ वाघमोडे, क्रीडा  अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, प्रभावती गाडेकर, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी राजेंद्र कदम, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशनचे सचिव राजू दाभाडे, रोलबॉल राज्य संघटना उपाध्यक्ष प्रताप पगार, पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशनाचे उपाध्यक्ष शैलेंद्र पोतनीस, अमित पाटील, पिंपरी चिंचवड शहर रोलबॉल असोसिएशनचे सचिव रफिक ईनामदार, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, क्रीडा पर्यवेक्षक ज्ञानदेव भिसे, विश्वास गेंगजे, रंगराव कारंडे, जयश्री भोज, जयश्री साळवे, सुभाष पवार, सोपान खोसे, अनिल मगर, नंदू फुगे, अशोक पटेकर, आत्माराम महाकाळ, बन्सी आटवे, गोरक्ष तिकोणे, वाल्मिकी पवार, प्रशांत उबाळे, गेणू जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, नगरसदस्य उत्तम केंदळे, पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशनाचे उपाध्यक्ष शैलेंद्र पोतनीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफिक ईनामदार यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री साळवे यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.
या स्पर्धा 16 व 17 नोव्हेंबर 2017 रोजी होत असून या स्पर्धेमध्ये राज्यातील पुरुष व महिलांच्या 22 सघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धा सुरुवातीस साखळी व नंतर बाद पद्धतीने दोन दिवस घेण्यात येणार आहेत.

Check Also

पिंपरी-चिंचवड़ शहर पुलिस बल में 262 पदों पर भर्ती,आज से आवेदन शुरू

पिंपरी-राज्य में 17 हजार 531 पुलिस कांस्टेबल पदों पर भर्ती की घोषणा की गई है। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *