ताज़ा खबरे
Home / खेल / मी रोबोट नाही, हवं तर चामडी सोलून बघा: विराट

मी रोबोट नाही, हवं तर चामडी सोलून बघा: विराट

कोलकाता। मैदानावर कायम आक्रमक असलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा खेळाडूंच्या विश्रांतीच्या मुद्द्यावरही आक्रमक झाला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळताना खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. ते पाहता मलाच नव्हे तर सर्वांना विश्रांतीची नितांत गरज आहे. मी काही रोबोट नाही, हवं तर चामडी सोलून बघू शकता, असे वक्तव्य त्याने केले. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत अष्टपैलू हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याच्या निर्णयाचेही त्याने समर्थन केले.
कोलकाता कसोटीपूर्वी बुधवारी विराटने माध्यमांशी संवाद साधला. वृत्तानुसार, त्याने खेळाडूंच्या विश्रांतीचा मुद्दा लावून धरला. ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणाऱ्यांना विश्रांतीची गरज आहे. मलाही गरज आहे. शरीराला विश्रांती मिळावी असे मला वाटते त्यावेळी मी ती घेतो. मी काही रोबोट नाही. हवे तर माझी कातडी काढून बघू शकता. त्यातून रक्त वाहील’, असे तो म्हणाला. श्रीलंकेविरुद्ध मालिकेत अष्टपैलू खेळाडू पंड्याला विश्रांती दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.
हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याचा निर्णय योग्य असल्याचे विराटचे म्हणणे आहे. भारतीय क्रिकेटर वर्षाला सरासरी ४० सामने खेळतात. ज्या खेळाडूवर अधिक दडपण असते, त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे, असे तो म्हणाला. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर विश्रांती देण्यात यावी, अशी मागणी विराटने बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त होते.

Check Also

देश में लागू हुआ सीएए,केंद्र सरकार का नोटिफिकेशन जारी

तीन देशों के गैर मुस्लिम शरणार्थियों को मिलेगी नागरिकता नई दिल्ली-केंद्र की मोदी सरकार ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *