ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / सिंहगडावर प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सिंहगडावर प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे। (PNE)- सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाजा जवळ झाडाला गळफास घेऊन एका प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरूण व तरूणीची ओळख अद्याप पटली नाही. त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आहे.

शेखर रघुनाथ मोहोळ आणि ज्योती संतोष मोहोळ (रा. भरेकरवाडी, मुठा, मुळशी) अशी या प्रेमी युगुलांची नावे आहेत.

एका पर्यटकाने सिंहगडावरील वन सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हवेली पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोचत आहेत. सिंहगडावर जाणाऱ्या घाटात दरड प्रतिबंधात्मक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद आहे. हे दोघे आतकरवाडीतून गडावर चालत गेले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे

Check Also

देश में लागू हुआ सीएए,केंद्र सरकार का नोटिफिकेशन जारी

तीन देशों के गैर मुस्लिम शरणार्थियों को मिलेगी नागरिकता नई दिल्ली-केंद्र की मोदी सरकार ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *