ताज़ा खबरे
Home / पुणे / राज्यात पुढील वर्षी होणार अडीच कोटी वृक्ष लागवड

राज्यात पुढील वर्षी होणार अडीच कोटी वृक्ष लागवड

पुणे। जागतिक तापमानात होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र 20 टक्‍क्‍यांवरून 33 टक्के नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने घेतला आहे. 2017 यावर्षी राज्यात 72 लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यानुसार दि. 1 जुलै ते 31 जुलै 2018 या एक महिन्याच्या कालावधीत राज्यात अडीच कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. पुणे जिल्ह्यात 25 लाख 86 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यभरात 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम राबविण्याचे धोरण ठरविण्यात आले होते. त्यादिवशी जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहज ओलांडले गेले. प्रत्यक्षात एकाच दिवशी 2 कोटी 83 लाख वृक्ष लागवड झाली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे दखल घेतली. सर्व क्षेत्रातील लोकांच्या प्रामाणिक व स्वंयस्फूर्तीने केलेल्या कामामुळे हे यश संपादन करता आले. वृक्षारोपणची गती तुटू न देता त्यामध्ये सातत्य ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार 2017 पासून पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ठ ठरविण्यात आले आहे. त्याबाबत शासनाने कृती कार्यक्रम तयार करून त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत.

आता 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ ठरविण्यात आले होते. त्यामध्ये वन विभागाव्यतिरिक्त इतर प्रशासकीय विभागांना 75 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी सर्व विभाग मिळून 72 लाख 55 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. 2018 मधील पावसाळ्यात एकंदर 13 कोटी वृक्ष लागवडींर्तगत वन विभागाव्यतिरिक्त इतर विभागांना अडीच कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

त्यानुसार शासनाच्या 34 विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि यंत्रणानिहाय वाटप केलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड व त्यानंतरचे संगोपन करण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद त्या-त्या विभागांनी उपलब्ध असलेल्या निधीतून अथवा सीएसआर फंडातून करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात 2017 मध्ये 7 लाख 50 हजार वृक्ष लागवड करण्यात आली होती. 2018 या आर्थिक वर्षामध्ये 25 लाख 86 हजार 885 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. यामध्ये ग्रामविकास विभागाला सर्वाधिक वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या विभागाला 6 लाख 75 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्याखालोखाल कृषी विभागाला 5 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाला 4 लाख, नगर विकास विभागाला 3 लाख81 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

Check Also

शनिवार से 2000 का नोट चलन से हो जाएगा बाहर

नई दिल्ली- अगर आपके पास 2000 रुपए का नोट है और उसे बदलवाने की सोच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *