ताज़ा खबरे
Home / पुणे / यंदाची पुणे मॅरेथॉन 3 डिसेंबरला; विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके

यंदाची पुणे मॅरेथॉन 3 डिसेंबरला; विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके

पुणे। यंदाची पुणे मॅरेथॉन स्पर्धा 3 डिसेंबरला होणार असून विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहे, असे महापौर टिळक यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे या स्पर्धेसाठी 35 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली आहे  व संयोजन समितीतर्फे 5 लाख रुपयांची रोख पारितोषिके व विजेत्यांना मॅरेथॉन करंडक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खेळाडूंना सहभाग पदके देण्यात येणार आहे. यंदा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 42 किलोमिटर 195मीटरची असणार आहे. ज्यात 21 किलोमीटर पुरूष आणि 21किलोमीटर महिलांची स्पर्धा असणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर 10 किलोमीटरची स्पर्धा असणार आहे. स्पर्धेत पुरूष व महिलांची 5 किलोमीटरची धाव असणार आहे. तर पुरूष व महिलांचे एकूण 7 स्पर्धात्मक गट असणार आहेत.

Check Also

शनिवार से 2000 का नोट चलन से हो जाएगा बाहर

नई दिल्ली- अगर आपके पास 2000 रुपए का नोट है और उसे बदलवाने की सोच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *