ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / शिवसेनेचे चार आमदार अजित पवारांच्या गाडीत; सारथ्य स्वतः अजितदादांनी केले!

शिवसेनेचे चार आमदार अजित पवारांच्या गाडीत; सारथ्य स्वतः अजितदादांनी केले!

वालचंदनगर : राजकाणामध्ये कोणी कायमचं दुश्‍मन नसतं आणि कुणी कायम बरोबर राहतं असही नसतं, हे वाक्‍य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळस (ता. इंदापूर) येथील एका कार्यक्रमात उच्चारले. त्याचा लगेच प्रत्यय देखील आला. शिवसेनेचे तब्बल चार आमदार अजित पवारांच्या गाडीत शनिवारी (28 सप्टेंबर) बसले होते. या गाडीचे सारथ्य स्वतः अजितदादांनी केले.

कळस येथील कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, राजापूरचे आमदार राजन साळवी, खानापूर -विटाचे आमदार अनिल बाबर, करमाळ्याचे नारायण पाटील, कॉंग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव सचिन देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तासगावच्या आमदार सुमन पाटील, इंदापूर तालुक्‍याचे आमदार दत्तात्रेय भरणे उपस्थित होते.

कळस येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नेचर डिलाईट डेअरीचे मालक व सरकारी ठेकेदार अर्जुन देसाई यांचे व उपस्थित राहिलेल्या आमदारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या आमदारांच्या तालुक्‍यांत देसाई यांचे बरेच कंत्राटे आहेत. या डेअरीचे उद्‌घाटन अजितदादांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर अजितदादांनी स्वतः गाडी चालवली. शिवसेनेच्या आमदारांसह इतर आमदारही गाडीत होते. जवळपास ही सारी मंडळी अडीच तास या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

आमदारांना सांभाळण्यात अजित पवार, हे माहीर समजले जातात. पवार हे सत्तेत असताना विरोधी पक्षाचा आमदार असला तरी त्याचे काम मार्गी लागेल, असे ते पाहायचे. त्यामुळे स्वतः गाडी चालवून सेनेच्या आमदारांचे त्यांनी योग्य आदरातिथ्य केले. मात्र यातील तीन सेना आमदार तर थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आलेले आहेत. त्यामुळे अजित पवारांची ही साखर पेरणी भविष्यात उपयोगी पडेल का, याची उत्सुकता आहे.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *