ताज़ा खबरे
Home / पुणे / हडपसरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

हडपसरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

पुणे-(PNE)- हडपसर येथील रामटेकडी परिसरात पुणे महापालिका प्रशासनाकडून नव्याने कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजप सरकार आणि महापालिकेविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, हडपसर येथे कचरा प्रकल्प आल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी याचा कोणताही विचार केलेला नाही. बहुमताच्या जोरावर भाजप हा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्प रद्द न केल्यास अधिक तीव्र लढा उभारू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 उरुळी देवाची, फुरसुंगी येथील ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यास वारंवार विरोध झाल्यानंतर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण झाली होती. शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध भागांत कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्याचा विचार करण्यात आला. यात हडपसर-रामटेकडी येथील २३ एकर जागेत कचरा प्रकल्प होणे प्रस्तावित आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली होती. यावेळी मुक्ता टिळक यांनी या मुद्द्यावर लोकप्रतिनीधींशी चर्चा करुन तोडगा काढू, असे म्हटले होते.

Check Also

शनिवार से 2000 का नोट चलन से हो जाएगा बाहर

नई दिल्ली- अगर आपके पास 2000 रुपए का नोट है और उसे बदलवाने की सोच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *