ताज़ा खबरे
Home / राष्ट्रीय (page 45)

राष्ट्रीय

रोडवरची नमाज रोखू शकत नाही; जन्माष्टमी कशी रोखणार: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ : ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बरोबर असेल तर कावडियांच्या यात्रेच्या वेळी डान्स करण्यावर, गाणं आणि डीजे वाजवण्यावर बंदी कशी काय लागू शकते?, असा सवाल स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागच्या सरकारने जन्माष्टमीच्या आयोजनावर बंदी घातली होती यावर …

Read More »

एसीपीजीच्या वाहनांमध्ये जीव गुदमरतो: राहुल गांधी

नवी दिल्ली : गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) वाहने का घेऊन जात नाहीत? असा पलटवार भाजपकडून करण्यात आला होता. मात्र राहुल यांनी गेल्यावर्षीच एसपीजीची वाहने खटारा असून त्यात जीव गुदमरतो. ही वाहने आरोग्यासाठी धोकादायक आहेत, अशी तक्रार केली होती. पण त्यावर …

Read More »

बलात्काराचा प्रयत्न फसला, इमारतीवरून फेकले

नवी दिल्ली : वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न फसल्याने दिराने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तिला फेकून दिलं. तिचं नशीब बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रूग्णालयात नेलं आणि ती बचावली. दिल्लीच्या वजीरपूर येथे रविवारी ही धक्कादायक घटना घडली. ही महिला घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेत तिच्या …

Read More »

बिहारः तेजस्वी यादवांची ‘जनादेश अपमान यात्रा’

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आजपासून महात्मा गांधी यांची कर्मभूमी चम्पारण येथून ‘जनादेश अपमान यात्रा’ सुरू करणार आहेत. तेजस्वी यादव यांची ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी त्यांची आई व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी तेजस्वी यांना टिळा लावून शुभेच्छा दिल्या. बिहारमधील जनतेने आरजेडी आणि जदयू या दोन पक्षांना …

Read More »

भाजपला धक्का; गुजरातमधून अहमद पटेल राज्यसभेवर!

गांधीनगर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवत राज्यसभेची जागा कायम राखली आहे. तर इतर दोन जागांवर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांच्या विजयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. …

Read More »

विरोधकांची एकजूट ही वांझोटी कल्पना : उमर अब्दुल्ला

श्रीनगर : भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या प्रयत्नांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांची एकजूट म्हणजे केवळ दंतकथा असून ती एक वांझोटी कल्पना आहे, अशी टीका करतानाच २०१९ मध्ये विरोधक स्वत:साठीच एकत्र येतील आणि भाजपला पुन्हा ५ वर्ष सत्तेची संधी …

Read More »

शाळांमध्ये योगा सक्तीची गरज नाही: SC

नवी दिल्ली : शाळांमध्ये योगा शिक्षण सक्तीचं करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘शाळांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही हे सांगण्याचं काम आमचं नाही. आम्ही त्यावर कसे काय आदेश देऊ शकतो?’ असा सवाल करतानाच ‘अशा मुद्द्यांवर केंद्र सरकारनेच निर्णय घ्यावा’, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये रात्रीच्या अंधारात मोहीम फत्ते

पुलवामा: भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत मारला गेलेला अबू दाजुना हा लष्करे तैयबाचा काश्‍मीरमधील प्रमुख होता. “ए’ कॅटॅगरीमध्ये गणला गेलेला हा मोस्ट वॉंटेड दहशतवादी होता. तो तब्बल बारा वेळा पोलिसांच्या तावडीत येता येता बचावला होता. अनेक वर्षांपासून सुरक्षा दले याच्या मागावर असल्याने काल (ता. 1) मध्यरात्री त्याच्याबाबत अत्यंत विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर …

Read More »

गुजरात किनाऱ्यावर ३५०० कोटींचे हेरॉइन जप्त

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजातून मोठ्या प्रमाणात हेरॉइन पकडले आहे. जप्त करण्यात आलेले हे हेरॉइन १५०० किलो इतके प्रचंड आहे. या एकूण हेरॉइनची किंमत ३५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ …

Read More »

GSTमुळं अर्थव्यवस्थेचा कायापालट!: मोदी

नवी दिल्ली: ‘वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू होऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. मात्र, आतापासूनच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ग्राहक, व्यापारी आणि सरकारमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे,’ असं सांगतानाच, ‘जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आहे,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन …

Read More »