ताज़ा खबरे
Home / पुणे (page 210)

पुणे

जादा पाणी वापरल्यामुळे पालिकेला 354 कोटीचा दंड

पुणे। पुणे महापालिकेने 2012 पासून राज्यशासनाने मंजूर केलेल्या कोटयापेक्षा साडेअकरा टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरले असून या पाण्यासाठी औद्योगिकदराने शुल्क आकारून या शुल्कावरील दंडाच्या रकमेपोटी जलसंपदा विभागाने 354 कोटी रुपयांची थकबाकी द्यावी, अशी मागणी जलसंपदा विभागाने एका पत्राद्वारे केली आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला साडेअकरा टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. परंतु …

Read More »

अमृतांजन पुलाला 80 टक्के नागरिकांचे अभय; 187 वर्ष जुना पूल पाडण्याचा प्रस्ताव

पुणे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 187 वर्षे जुन्या पुलाला पाडण्याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवल्या होत्या. यामध्ये सुमारे 80 टक्के नागरिकांनी हा पूल पाडू नये अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे एमएसआरडीसी समोर अडचण निर्माण झाली आहे. धोकादायक झालेला अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने …

Read More »

पाणीकपात कराल तर याद राखा.. ! पाणी कपातीच्या निषेधार्थ शिवसेनेचे हंडा आंदोलन

पुणे: जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेच्या पाणी वापरात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी असा आदेश दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेसमोर हंडा आंदोलन केले. पाणीकपात कराल तर याद राखा.. ! असा इशारा शिवसेनेने दिला. शासनाने पुणे महापालिकेला 2021 पर्यंत वार्षिक 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यानुसार शहराची आजची लोकसंख्या 39.18 लाख गृहित धरून …

Read More »

पुणे-लोणावळा मार्गावर नवीन तंत्रज्ञाची ईएमयू लोकल गाडी धावली

पुणे: पुणे यार्डात दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञाच्या ईएमयू लोकल गाडीला खासदार अनिल शिरोळे आणि श्रीरंग बारणे यांनी हिरवा झेंडा दाखवून या गाडीच्या पहिल्या फेरीचे आज सकाळी उदघाटन केले.  प्रवाशांनी या नवीन गाडीतून प्रवासाचा आनंद घेतला.  उदघाटन कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे आणि श्रीरंग बारणे, पुणे रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर पुणे- …

Read More »

गारठा वाढला, पुण्याचे किमान तापमान 11.4 अंश

पिंपरी: गुलाबी थंडी आता हळूहळू गोठवणा-या थंडीकडे वळत आहे. पुण्याचे आज (सोमवार) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 11.4 अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.  तर पुण्याचे कालचे तापमान 11.5 अंश इतके होते. नाशिकचे सर्वात कमी किमान तापमान 10.4 अंश इतके नोंदवले आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार तापमानात -3.2 अंश सेल्सिअस इतका फरक …

Read More »

मद्याच्या ब्रॅण्डला महिलांचे नाव द्या म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

पुणे। (PNE)- साखर कारखान्याने निर्मित केलेल्या मद्याच्या ब्रॅण्डला महिलेचे नाव द्या म्हणजे अधिक खप होईल, असे म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलावर्गाचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही मागणी केली …

Read More »

महापालिकांमध्ये महिनाभरात शिक्षण समिती स्थापन करणार – विनोद तावडे

पुणे। (PNE)- येत्या महिनाभरात सर्व महापालिकेत शिक्षणसमिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या जुन्या शिक्षण मंडळातील गैरव्यवहाराच्या घटना सातत्याने उघडकीस आल्याने मंडळाच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीका झाली. त्यामुळे शिक्षण मंडळ कामकाजाबाबत स्वतंत्र कायदा करण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला. …

Read More »

सशक्त लोकशाहीसाठी मन की बत- सी विद्यासागर राव

पुणे। (PNE)-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे चांगले साधन आहे. सशक्त लोकशाहीसाठी हा संवाद महत्वाचा असून याच धर्तीवर आधारीत असणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रमही स्तूत्य असल्याचे गौरोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज काढले.  येथील बालगंधर्व रंगमंदिरात …

Read More »

पुण्यात ब्रिटीशकालीन पुलाला 187 वर्षे पूर्ण होऊन देखील भक्कम

पुणे। (PNE)- शहरातून वाहणार्‍या मुळा- मुठा नद्यांवर एकूण 31 पूल असून त्यातील 7 पूल हे ब्रिटीशकालीन आहेत. महापालिकेने सन 2013-14 मध्ये खासगी संस्थेकडून या सर्व पुलांचा भक्कमपणा शास्त्रीय आधारावर तपासून घेतला. संस्थेने दिलेल्या अहवालामध्ये ब्रिटीशकालीन पूल अजून भरभक्कम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वेलस्ली पुलास 187 वर्षे तर संभाजी पुलास …

Read More »

धक्कादायक…पुणे शहरात डेंग्यूचे तब्बल चार हजार रुग्ण!

पुणे। (PNE)- पावसाने यंदा मुक्काम वाढवल्याने पुण्याला डेंग्यूच्या डासांनी विळखा घातला असून शहरात तब्बल चार हजार डेंगीचे रुग्ण असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. शहरातील कसबा पेठ, विश्राबागवाडा, येरवडा, शिवाजीनगर, धानोरी, ढोले पाटील रस्ता, हडपसर मुंढवा या भागात डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले असून या परिसरातील नागरिकांना डेंग्यूची सर्वाधिक लागण झाली …

Read More »