ताज़ा खबरे
Home / पुणे (page 200)

पुणे

सिंहगडावर प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे। (PNE)- सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाजा जवळ झाडाला गळफास घेऊन एका प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरूण व तरूणीची ओळख अद्याप पटली नाही. त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. शेखर रघुनाथ मोहोळ आणि ज्योती संतोष मोहोळ (रा. भरेकरवाडी, मुठा, मुळशी) अशी या …

Read More »

राज्यात पुढील वर्षी होणार अडीच कोटी वृक्ष लागवड

पुणे। जागतिक तापमानात होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र 20 टक्‍क्‍यांवरून 33 टक्के नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने घेतला आहे. 2017 यावर्षी राज्यात 72 लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यानुसार दि. …

Read More »

यंदाची पुणे मॅरेथॉन 3 डिसेंबरला; विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके

पुणे। यंदाची पुणे मॅरेथॉन स्पर्धा 3 डिसेंबरला होणार असून विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहे, असे महापौर टिळक यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुणे महानगरपालिकेतर्फे या स्पर्धेसाठी 35 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली आहे  व संयोजन समितीतर्फे 5 लाख रुपयांची रोख पारितोषिके व विजेत्यांना मॅरेथॉन करंडक देण्यात येणार आहे. …

Read More »

पुण्याच्या श्रेया तुपे बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र 2017’

पुणे। (PNE)- गृहिणी असलेल्या पुण्याच्या श्रेया तुपे यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत ‘मिसेस महाराष्ट्र 2017’वर आपले नाव कोरले. गृहिणी असूनही सासूबाईंसह कुटुंबातील सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने हा सन्मान मिळवू शकले, अशी भावना श्रेया तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी श्रेया यांचे पती आणि कृष्णाई वॉटर पार्कचे संचालक अभिषेक तुपे, सासूबाई रत्नमाला तुपे, …

Read More »

महंमदवाडी चौकात गादी कारखान्याला भीषण आग

पुणे। (PNE)- हडपसर येथील महंमदवाडी चौकातील एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.  घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन फायरगाड्या आणि खाजगी टँकर दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. परंतू नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळाली …

Read More »

सिनेमाच्या रांगेत उभे राहता तर राष्ट्रगीतासाठी का नाही? अभिनेते अनुपम खेर यांचा सवाल

पुणे। (PNE)- चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहता, हॉटेलच्या रांगेत उभे राहता तर मग देशाच्या राष्ट्रगीतासाठी का उभे राहू शकत नाही, असा सवाल एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी विचारला. मुक्तछंद आयोजित प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रगीतावेळी आपण उभे राहत असलेल्या 52 सेकंदांत …

Read More »

काशीद येथील समुद्रात बुडून पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

पुणे। (PNE)- काशीद येथे समुद्रपर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुस-याचा शोध सुरू आहे. ही घटना रविवार (29 ऑक्टोबर) रोजी घडली. मयतांमध्ये अक्षय भोसले (रा. औरंगाबाद) आणि अमोल नाझरे (रा. पुणे) यांचा समावेश आहे. यातील अक्षय भोसले याचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातील …

Read More »

शिवसेनेचे चार आमदार अजित पवारांच्या गाडीत; सारथ्य स्वतः अजितदादांनी केले!

वालचंदनगर : राजकाणामध्ये कोणी कायमचं दुश्‍मन नसतं आणि कुणी कायम बरोबर राहतं असही नसतं, हे वाक्‍य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळस (ता. इंदापूर) येथील एका कार्यक्रमात उच्चारले. त्याचा लगेच प्रत्यय देखील आला. शिवसेनेचे तब्बल चार आमदार अजित पवारांच्या गाडीत शनिवारी (28 सप्टेंबर) बसले होते. या गाडीचे सारथ्य स्वतः अजितदादांनी केले. …

Read More »

हडपसरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

पुणे-(PNE)- हडपसर येथील रामटेकडी परिसरात पुणे महापालिका प्रशासनाकडून नव्याने कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजप सरकार आणि महापालिकेविरोधात निषेध नोंदवण्यात आला. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, हडपसर येथे कचरा प्रकल्प …

Read More »

गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार: मीरा कुमार

पुणे-(PNE)- गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बहुमताने जिंकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवरील जनतेचा असंतोष वाढत चालल्याने या निवडणुकीत जनता त्यांच्या मतांच्या माध्यमातून भाजपाचा पराभव करेल, असंही मत मीरा कुमार यांनी व्यक्त केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघाला यावेळी मीरा …

Read More »